शिनोळी येथील एका डॉक्टरची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शिनोळी आणि शिनोळी परिसरातील जवळ जवळ दोनशे लोकांचा संपर्क सदर डॉक्टरशी आलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या लोकांच्यामुळे शिनोळीच्या बाजूने बेळगाव साठी धोका वाढला आहे
शिनोळीच्या बाजुने आणि काही चोरट्या वाटेनेही लोकं बेळगावात प्रवेश करत आहेत. मोठ्या प्रमाणात सीमेवर येऊन उभा राहिलेल्या कोरोणाची प्रशासनाने दखल घेत कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोणत्याही निमित्ताने बेळगावात वेंगुर्लारस्त्यावरून लोक येत असतील त्यांची चाचणी केली गेली पाहिजे. अत्यावश्यक सेवेच्या निमित्ताने येणाऱ्या लोकांचीही चाचणी होणे गरजेचे आहे.
चंदगड गडिंग्लज भागात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर बेळगाव प्रशासनाने सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे. चंदगड गडहिग्लज बेळगाव हे कनेक्शन मोठ्या प्रमाणात आहे. नातेसंबंधामुळेही लोक जा ये करत आहेत याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे.
दोन्ही शिनोळी गांव सील डाउन करण्यात आली आहेत तर बाची सह शिनोळी जवळील गावात आरोग्य खात्याने अलर्ट दिला आहे.
Right have to be tested everyone