जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये दाखल झालेल्या अथणी तालुक्यातील रड्डीरट्टी गावच्या 68 वर्षाच्या वृद्धाने पोटदुखीमुळे तळमळून प्राण सोडला.या वृद्धाला कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
गुरुवारी रात्रीपासून पोटात दुखत असल्याचे त्या वृद्धाने नर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांना सांगितले.पण वृद्धच्या तक्रारीकडे कोणीच लक्ष दिले नाही.रात्रभर हा वृद्ध पोटात दुखतंय म्हणून जमिनीवर गडाबडा लोळत होता.पण त्याच्यावर उपचार करण्यात आले नाहीत.
अखेर शुक्रवारी सकाळी त्या वृद्धाचा मृत्यू झाला.वृद्धाचा मृत्यू झाल्यावर त्याची माहिती त्याच्या नातवाला देण्यात आली.शुक्रवारी सर्वच माध्यमांनी या वृध्दाच्या मृत्यूची बातमी लाऊन धरली आहे त्यामुळे इथून पूढे तरी बिम्स कर्मचाऱ्यांचे डोळे उघडतील का?रुग्णांवर योग्य उपचार व्हावेत अशी मागणी वाढत आहे.
.पण वृद्धाच्या घरातील सगळेजण क्वारंटाईन असल्याचे नातवाने सांगितले.त्यामुळे मृत व्यक्तीचे अंत्यदर्शन देखील वृद्धाच्या नातेवाईकांना घेता येणार नाही.