कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे एपीएमसीच्या व्यवहाराच्या वेळा बदलण्यात आल्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश बजावला आहे.यापुढे एपीएमसी चे कामकाज पहाटे पाच ते दुपारी एक वाजेपर्यंत चालणार आहे.
या वेळेतच एपीएमसी मधील सगळे व्यवहार करण्याचा आदेश बजावण्यात आला आहे.काही व्यापारी सायंकाळी उशिरा पर्यंत शेतकऱ्यांना भाजीपाला आणायला लावून व्यवहार करत आहेत.
एपीएमसी मधील सगळे व्यवहार पहाटे पाच ते दुपारी एक या वेळेतच करावेत.या वेळे व्यतिरिक्त जे व्यवहार करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही कळवण्यात आले आहे.
सरकारच्या नियमांचे पालन करून एपीएमसी मधील व्यापाऱ्यांनी व्यवहार करावेत असेही कळवण्यात आले आहे.
बेळगाव शहरातील होलसेल भाजी मार्केट मध्ये सर्वाधिक गर्दी होत असते कोविड संदर्भातील सोशल डिस्टन्स उल्लंघन या ठिकाणी होताना दिसत आहे म्हणून जिल्हाधिकारी यांनी हा आदेश बजावला आहे.