Monday, January 20, 2025

/

कोरोनाला न घाबरता त्याची चेन तोडा : आम. बेनके यांचे जनतेला जाहीर आवाहन

 belgaum

नियमांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घेतल्यास आणि धीर न सोडता लढाऊ वृत्ती बाळगल्यास आपण कोरोनाचा नव्हे तर त्याच्या बापाला ही हरवू शकतो. तेंव्हा माझी जनतेला विनंती आहे. कार्यकर्ते मित्रमंडळींसह सर्वांनाच विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत कोरोनाला न घाबरता त्याची चेन तोडा, असे जाहीर आवाहन चार दिवसापूर्वी स्वतःहून होम काॅरंटाईन झालेले आणि कोरोनाची लक्षणे आढळलेले बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केले आहे.

बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज मंगळवारी एका व्हिडिओद्वारे उपरोक्त जाहीर आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्याची शंका आल्याने चार दिवसापूर्वी आपल्या गेस्ट हाउसमध्ये स्वतःहून होम काॅरंटाईन झालेले आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यात कोरोनाची लक्षणे असल्याचा अहवाल काल सोमवारी रात्री हाती आला. आपल्या वाढदिवसा दिवशीच मिळालेली हि कोरोनाची भेट आमदार बेनके यांनी खंबीरपणे स्वीकारली असून जनतेने कोरोनाला घाबरून जाण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्या जाहीर आवाहनाच्या प्रारंभी ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आमदार बेनके यांनी आभार मानले. कोरोनाबद्दल भीती कशासाठी? मी आता कोरोना संशयित रुग्ण आहे. परंतु माझ्याकडे बघितल्यानंतर माझी तंदुरुस्ती पाहून मी रुग्ण आहे हे कोणाला पटणार नाही. रोजच्यापेक्षा माझ्यात जास्त सतर्कता आणि उत्साह आहे. याला कारण मी घाबरून गेलेलो नाही. आम्ही घाबरून जाऊन बिकट परिस्थिती ओढवून घेत आहोत, असे बेनके यांनी सांगितले.

सरकार व आरोग्य खात्याच्या नियमांचे पालन करून स्वतःची काळजी घ्या. या रोगाला घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही. ज्या लोकांना कोरोना झाला आहे त्यांना प्रत्यक्ष भेटू नका परंतु त्यांच्याशी फोनवर संपर्कात रहा. त्यांच्या नातलगांना फोन करा. काही काळजी करण्याची गरज नाही असे सांगून त्यांना धीर द्या. त्यांना कांही अडचण आल्यास आजूबाजूची कार्यकर्ते त्यांच्या मदतीला धावले पाहिजेत. कारण कोरोना झालाय म्हटलं की सगळे पळून जातात अशी सध्या परिस्थिती आहे. परंतु प्रत्यक्षात इतके घाबरण्याची काही गरज नाही. असे न करता आजूबाजूचे यांनी तुम्ही-आम्ही संबंधितांना धीर दिला पाहिजे.

कार्यकर्ते मित्रमंडळी यांच्यासह समस्त जनतेला माझी विनंती आहे की, कोणत्याही परिस्थितीत या कोरोनाला घाबरू नका. थोड्याफार फरकाने तो सर्वांना येऊन जाणारच. आमच्यासारख्यांनी तपासणी केली तर समजणार नाही तर कोरोना झाल्याचे समजणारही नाही. एकूण घाबरून जाण्यासारखा हा रोग नाही. सारांश इतकाच की माझ्याबद्दल सोशल मीडिया अथवा टीव्ही वर माझ्याबद्दल बातम्या दिल्या किंवा दाखविल्या जात आहेत हे ठीक आहे. तथापि कोणीही कोरोनाला घाबरून जाण्याची गरज नाही. फक्त स्वतःची काळजी घ्यावी, घराबाहेर पडून चार लोकांत मिसळू नये. कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळल्याशिवाय कोरोनाची चेन तुटणार नाही, ही चेन तुटली पाहिजे हे सर्व आपल्या सर्वांच्या हातात आहे. कोरोनाला हरवणे कठीण नाही. मात्र तुम्ही-आम्ही तसे ठरवले पाहिजे. त्यासाठी सोशल डिस्टंसिंगचे पालन, अनावश्यक घराबाहेर जाणे टाळणे, मास्कचा वापर करणे, सॅनिटायझर वापरणे आणि महत्वाचे म्हणजे धीर न सोडता अंगात लढाऊ वृत्ती बाळगणे हे सर्व केल्यास आपल्याला कोरोनाच्या बापाला ही घाबरण्याची गरज नाही, असे आवाहन आमदार ॲड अनिल बेनके यांनी शेवटी पुन्हा एकदा केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.