कोरोना तपासणीसाठी निर्धारित दरापेक्षा अधिक पैशाची आकारणी करणाऱ्या बेंगलोर येथील अपोलो हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने शेषाद्रीपुरम बेंगलोर येथील अपोलो हॉस्पिटलला कोरोना तपासणीसाठी जादा दर आकारल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
अपोलो हॉस्पिटलने गेल्या 25 जून 2020 रोजी covid-19 तपासणीसाठी अर्थात कोरोना तपासणीसाठी 4,500 रुपये इतका निर्धारित दर आकारण्याऐवजी चक्क 6,000 रुपये इतका दर आकारल्याचे उघडकीस आल्याने सदर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
बेळगावातील इस्पितळानी याची दखल घेणे गरजेचे आहे.