मंगळवारी पासून लॉक डाऊन घोषित होईल या भीतीने बेळगाव परिसरातील व्यापाऱ्यांनी खरेदीसाठी रविवार पेठच्या मुख्य मार्केट मध्ये गर्दी केली होती.बंगळुरू शहर आणि ग्रामीण उध्या पासून सात दिवस लॉक डाऊन होणार आहे या शिवाय राज्यातील इतर जिल्हे देखील लॉक डाऊन करण्याची शक्यता आहे .
बेळगाव जिल्हा लॉक डाऊन करण्याची गरज नाही असा अहवाल जिल्हाधिकारी डॉ एम जी हिरेमठ यांनी राज्य सरकारला दिला आहे त्यामुळे बेळगाव लॉक डाऊन होण्याची शक्यता कमी आहे असे असताना देखील भीतीने किरकोळ व्यापारी आणि जनतेने रविवार पेठ मध्ये खरेदीसाठी गर्दी केली होती त्यामुळे ट्राफिक जामचे दृश्य सोमवारी सायंकाळी पहायला मिळाले.
एकीकडे मंगळवार हा दिवस बेळगाव रविवार पेठ सह बाजाराला सुट्टीचा दिवस असतो त्यामुळे देखील सोमवारी गर्दी असते मात्र लॉक डाउन होईल म्हणून सोमवारी गर्दी झाली होती.
बेळगाव जिल्ह्यातील निपाणी गोकाक मुडलगी अथणी आणि चिकोडी हे तालुके सात दिवस लॉक डाऊन झाले आहेत पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी हे तालुके लॉक डाऊन करण्याची घोषणा काल केली होती. सोमवारी बेळगाव बाबत काय घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बेळगाव शहर आणि तालूका लॉक डाऊन करा अशी मागणी वाढली असताना जिल्हा प्रशासनाने मात्र केवळ पाच तालुके लॉक डाऊन केले आहेत बेळगाव शहरा बाबत शक्यता कमी आहे.