मंगळूर उत्तरचे आमदार डाॅ. भारत शेट्टी हे राज्यातील आणखी एक नवीनतम लोकप्रतिनिधी आहेत की ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
मंगळुर उत्तरचे आमदार डाॅ. भारत शेट्टी यांनी आज गुरुवारी एका ट्विटद्वारे आपल्याला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती दिली आहे. “माझा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. परंतु आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी लवकर बरा होत असून मला कांही दिवस उपचाराखाली राहावे लागेल.
माझी सर्वांना विनंती आहे की, सोशल डिस्टंसिंगचे पालन करा. घराबाहेर पडताना मास्क घाला आणि हात वरचेवर धुवा. कृपया स्वतःची आणि तुमच्या निकटवर्तीयांची काळजी घ्या”, असा तपशील आमदार डाॅ. भारत शेट्टी यांच्या ट्विटमध्ये नमूद आहे.