*महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने उद्या सोमवार दिनांक 27 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता बेळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे रुग्णालये कमी पडत आहेत तेव्हा बेळगाव येथे “जीवनरेखा रेल्वेची” उपलब्धता करवून द्यावीअशी मागणी युवा समितीच्या वतीने केली जाणार आहे.
बेळगाव शहरआणि परिसरातइतर संसर्गजन्य रोगाच्या आणि कोरोनाची तपासणी करण्यासाठी विभागवार फ्लू क्लीनिक सुरवात करावी अशीही मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्या वतीने सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांना केली जाणार आहे.
हेल्प फॉर निडी कडूनही निवेदन
हेल्प फॉर निडी संकल्पना राबवणारे सुरेंद्र अनगोळकर देखील अनेक विषयांच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहेत.
आज जगभरात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होतोय. कोरोनाच्या संसर्गात इतर आजार हरवून गेले आहेत. त्यांना उपचारासाठी या हॉस्पिटलातुन दुसऱ्या हॉस्पिटल चे हेलपाटे करावे लागत आहेत. अन यामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात फार वेळ वाया जात आहे बऱ्याच वेळा उपचारा अभावी मृत्यूला सामोरं जावं लागतं आहे.आपणच सांगत आहोत की कोरोनाची जनजागृती करा दुसरीकडे इतर रोगाचा उपचार न करता त्यांना वापस पाठवता. त्यामुळे कोरोनाची भिती वाढती आहे. आम्ही आमच्या परीने प्रशासनाला ईतर रोगाच्या उपचारासाठी सरकार निश्चित दरात बेळगाव मध्ये सेवा देण्यासाठी हॉस्पिटल उपलब्ध करून देण्यात आली पाहिजे यासह अनेक मागण्यांसाठी उद्या निवेदन देणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सकाळी 11:00 वाजता अनेकांनी उपस्थित राहून या मागणीला प्रत्यक्ष पाठींबा द्याल ही अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.