समितीचा उंठ करवट बदलत आहे. आता लोकांना काय खरं काय खोटं हे समजू लागलं आहे, कुणाच्या निष्ठा कुणाशी बांधील आहेत हे लोकांच्या लक्षात येऊ लागलं आहे.
1जून रोजी हुतात्म्यांना अभिवादन करताना जनतेकडे ताठ मानेने बघण्याची यांची आता लायकी राहिली नाही.रक्ताची होळी करून ज्या हुतात्म्यांनी सीमा प्रश्नांसाठी निष्ठा दावली त्यांच्या पवित्र आत्म्याला क्लेश देणारी ही मंडळी समितीच्या पाठीत खंजीर खुपसणारी अवलाद आहे.
कुणाचं अथणीसी, कुणाचे ग्रामीणशी कनेक्शन आहे कुणाला कशाचेच भय राहिलेले नाही सगळ्यांची बेरकेगिरी चालू झाली आहे.समितीच्या नावावर सत्ता भोगलेल्यानीच समितीच्या गळ्याला नख लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. मराठी भाषेशी गद्दारी केली आहे.समितीशी एकनिष्ठ असणारी जनता त्यांच्या पासून त्रस्त होऊन गप्प घरात बसली ही यांची नालायकी आहे.
तालुका समितीच्या नावावर धोंडा जरी बसवला तरी निवडून येत होता, हा समितीचा लौकिक पायधुळी तुडवायला लावण्यात हे कपाळ करंटे लोक कारणीभूत आहेत.काळम्मा देवीच्या पायथ्याशी रहाणारा आपले एकीचे अस्वल पुढे करून राष्ट्रीय पक्षांना त्याची भीती दाखवत आपल्या म्होरक्या पावशेर साठी अच्छेरभर रक्कम गोळा करत आहे.
पावशेर नेत्यांचा त्रागा तर टिपेला पोहोचला आहे. आपलं पितळ उघडे पडतंय म्हणून तो अवस्थ झाला आहे. एखाद्या गावाचा लौकिक त्या गावच्या कर्तृत्ववान माणसामुळे मोठा होतो, पण त्याच गावच्या एखाद्या माणसाने समाजद्रोही, संघटनाद्रोही काम केलं तर गावालाच बट्टा येतो पावशेराच्या असल्या कारनाम्यामुळे मराठी जनता अस्वस्थ होऊ लागली आहे. दबक्या आवाजात पावशेरचं मापट उलटे करायचा त्यांनी चंग बांधला आहे.
तालुक्यातील व्यवहार करत करत पुन्हा एकदा मनपात साठमारी खेळायला यायचा त्यांचा विचार चालू आहे.काळम्मा देवीच्या डोंगराच्या पायथ्याशी रहाणारा दाढीवाला जिल्हा पंचायतीची स्वप्नं बघू लागला आहे.आपल्या पांढऱ्या कपड्या वरचा काळा डाग लपवत त्याच्या सेटिंग लिला सुरूच आहेत.
पावशेर नेता मनपाच्या वाटेवर जाताजाता ग्रामीणच्या लक्ष्मीला साकडं घालतो, तुमच्या भक्तांना मी खाल्लेल्या रबडीची कुठं वाच्यता करू नका असे सांगा अश्या विनवण्या करत आहे.
समितीतल्या किडक्या आणि सडक्या वृत्तीला ठेचून काढायचा काम बेळगाव live चालूच ठेवणार आहे. तालुका समिती नक्कीच सॅनीटाईज होईल समितीला लागलेला कोरोना दूर होईल अशीच आशा. वाचा. .पुढील वेळी ‘समितीतले बोके’- क्रमशः