आज वडगाव येथील मंगाई देवीची यात्रा आहे कोरोनाच्या प्रादुर्भावा मूळे सदर यात्रा रद्द करण्यात आली आहे.मन्दिर परिसर बॅरिकेड्स लावण्यात आले असून सामान्य जनतेला प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
दरवर्षी लाखो भाविक या यात्रेत सहभागी होत असतात मात्र हे पाहिलं असं वर्ष असणार आहे जिथं मन्दिर परिसर निर्मनुष्य झाला आहे.मंगळवारी 11 वाजता मोजक्या पंच मंडळींच्या उपस्थितीत देवीचे गाऱ्हाणे उतरवण्यात येणार आहे.
शेकडो वर्षा पासून चालू असलेली ही यात्रेची परंपरा यावर्षी सार्वजनिक रित्या जरी मोठ्या प्रमाणात होत नसली तरी घरोघरी केवळ आपल्या कुटुंबा पुरती साजरी केली जात आहे.पंच कमिटीने देवीची मंदिरा पूरती मोजक्या पंचाच्या उपस्थितीत साजरी करत आहेत.
मंगळवारी सकाळी पासूनच मंदिर परिसरात पंच मंडळा कडून मन्दिर परिसरात कुणीही येऊ नये असे माईक वरून आवाहन करण्यात येत होते.पाटील गल्ली भागांत बॅरिकडेस लावण्यात आले आहेत.कोरोनाच्या प्रादुर्भावा मूळे वडगांव सह मुतगा येथील भावकेश्वरी देवीची देखील यात्रा रद्द करण्यात आली आहे.
वडगांव भाग मुख्यतः श्रमजीवी लोकांचा आहे शेतकरी,कामगार,विनकर अशी श्रमावर विश्वास ठेवणारी जनता वडगांव परीसरात आहे.शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने जत्रेचे महत्व या भागात टिकून आहे.