अखेर बेळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यात लॉकडाऊन झाला जाहीर झाला असून मंगळवारी रात्री 8 वाजल्या पासून याची अंमलबजावणी होणार आहे.
बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना संक्रमणा बरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. याची गंभीर दखल दखल घेत, बेळगाव जिल्ह्यातील गोकाक,मुडलगी, अथणी, कागवाड आणि निपाणी या तालुक्यांमध्ये आज दिनांक 14 जुलै रात्री आठ वाजल्यापासून, 22 जुलै सकाळी पाच वाजेपर्यंत सात दिवसांचा कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी जारी केलेल्या लॉकडाऊन आदेशा अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या लॉक डाउन तालुक्यांमध्ये, शासनाने जाहीर केलेली लॉकडाऊन मार्गसुची ची कडक अंमलबजावणी करण्या बाबत त्या तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत.
कोरोना चे वाढते संक्रमण आणि मृत्यूचे प्रमाण याचा विचार करून तसेच तज्ञांशी चर्चा करून,जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी कठोर उपाययोजना हाती घेण्यात आले आहेत.लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यातील जनतेने लॉकडाऊन मार्गसुचीचे पालन करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी केले आहे.