राज्यातील कोरोना प्रादुर्भावाचा उद्रेक अद्यापही आटोक्यात आलेला नसून गेल्या 24 तासांत राज्यभरात नव्याने 5,503 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार बुधवार दि. 29 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,12,504 इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील विविध हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 42,901 इतकी झाली आहे.
बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 279 रुग्ण सापडल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2,811 इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे आज आणखी 3 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची एकूण संख्या 61 झाली आहे. जिल्ह्यात ॲक्टिव्ह केसेस 1,969 असून यापैकी 9 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. काल सायंकाळपासून आज दिवसभरात हॉस्पिटलमधून 67 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे जिल्ह्यात डिस्चार्ज मिळालेल्यांची एकूण संख्या 781 इतकी झाली आहे.
राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. 28 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज बुधवार दि. 29 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 5,503 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 12 हजार 504 इतकी झाली आहे.
राज्यात ॲक्टिव्ह केसेस 67,448 असून यापैकी 639 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यभरात आज बुधवारी 2,397 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 42,901 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 92 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 2,147 झाली असून यापैकी 8 जणांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.
कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून गेल्या 24 तासात या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आज सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पहिल्या पांच क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 2270 रुग्ण – एकूण रुग्ण 51091), बेळ्ळारी (338-5720), बेळगाव (279-2811), दावणगिरी (225-1893) आणि मंगळूर (208-5306).