Sunday, January 5, 2025

/

त्या आरोपींचा अहवाल निगेटिव्ह

 belgaum

माळमारुती पोलिसांनी हनी ट्रॅप या प्रकरणी पाच जणांना अटक केली होती. त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

पंधरा दिवसांसाठी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र याआधी त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे त्यांना कोरोनाची बाधा आहे की नाही याचे स्वब घेऊन तपासणी करण्यात आली होती. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आता त्यांना मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले आहे.

गौरी सुरेश लमानी वय 28 राहणार सौंदती मंजुळा लकप्पा जुटेनावर वय 29 राणा रामदुर्ग सध्या राहणार सौंदत्ती संगीता प्रकाश कनकीकोप्प वय 30 राहणार उगरगोल, तालुका सौंदती, सदाशिव सिद्धाप्पा चिपलकट्टी वय 33 राहणार नेहरूनगर, रघुनाथ धुमाळे वय 28 राहणार खडेबाजार अशी त्यांची नावे आहेत. मारिहाळचे पोलीस निरीक्षक बी आर गडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या पाच जणांना अटक केली होती. त्यांच्यावर कलम 120 (बी), 384, 395 सहकलम 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्या सर्वांना येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.

न्यायालयाने त्यांची रवानगी येथील मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत केली आहे. त्यांची चाचणी निगेटीव्ह आल्याने पोलिस अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे. रॅपिड च्या माध्यमातून त्यांची चाचणी झाली आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या काही आरोपींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कारागृहात खळबळ माजली होती. आता यांचा अहवाल निगेटिव आला आहे. त्यामुळे काहीसा दिलासा पोलिस अधिकाऱ्यांना मिळाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.