Wednesday, January 15, 2025

/

खोकला-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

ही शरीराची संरक्षणात्मक प्रतिक्षिप्त क्रिया असून याद्वारे श्वसनमार्गातील क्षोभजनक पदार्थ, धूर, धूलीकण, प्रदूषित हवा किंवा श्वसनमार्गातील जंतू फुप्फुसातून सोडलेल्या हवेच्या दाबाने बाहेर टाकले जातात. आपल्या श्‍वासनलिकांत अडकलेले स्राव काढून टाकून श्‍वासनलिका मोकळ्या व्हाव्यात हा खोकल्याचा हेतू होय.
यामध्ये तीन क्रिया होतात. प्रथम मोठा श्वास घेतला जातो. नंतर ध्वनियंत्रणेच्या पट्ट्या एकमेकांजवळ येतात. छाती व पोट यातील विभाजन पटल (डायफ्रॅम) सैल होतो व छातीच्या पोकळीतील दाब वाढतो. फुप्फुसातील दबलेली हवा कंठद्वारामधून एकदम व मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्याची क्रिया व एक विशिष्ट आवाज याने खोकला निदर्शित होतो. खोकला अपोआप किंवा मुद्दामही काढत येतो. जर एखाद्याला सारखा सारखा खोकला येत असेल तर असे समजायला हरकत नाही, की त्याला एखाद रोग झाला आहे

पावसाळ्यात सर्दी-खोकला होतोच होतो. त्यातच चुकून दूषित पाणी प्यायले गेले किंवा काही तेलकट खाल्ल्यास सर्रास घसा खराब होऊन आपल्याला खोकला सुरू होतो. अशावेळी अॅन्टिबायोटिक्सचा वापर करण्याऐवजी होमिओपॅथीमधील सूक्ष्म औषधांचा वापर करणे अधिक चांगले.
खोकल्याचे ओला आणि कोरडा खोकला असे प्रकार असतात.
ओला खोकला

छाती कफाने भरली असेल, श्वसननलिकेची जळजळ होत असताना घशातून खोकला येत असल्यास त्याला ओला खोकला म्हणतात. यात थोड्या थोड्या वेळाने सतत खोकला येतो. यात घसा खाकरून खोकला येतो. ओल्या खोकल्यात थोड्याप्रमाणात कफ बाहेर येतो. या खोकल्यासाठी ॲंटीमनी टार्ट नावाचे औषध उपयोगी पडते.
ओल्या खोकल्यात खोकताना चेहरा काळा-निळा पडत असल्यास कार्बो वेज 30 हे औषध घ्यावे.
ताठ बसल्यास किंवा उजव्या कुशीवर झोपल्यास खोकला कमी होतो. ओल्या खोकल्यात घसा बसतो.
कोरडा खोकला
कोरडा खोकला छातीतून किंवा पोट आवळून येतो. यात मोठा आवाज होतो. काही वेळा पडजीभ वाढल्यास कोरडा खोकला होऊ शकतो. कोरड्या खोकल्यामुळे गुदमरल्यासारखे होते. काहीवेळा खोकताना शिंका ही येतात. या खोकल्यात
ब्रायोनिया, स्पॉजिया ही औषधे घ्यावी.
www.drsonalisarnobat.com

कोरड्या खोकल्यात सतत तहान लागत असल्यास अकोनाईट 30 हे औषध घ्यावे. ड्रोसेरा नावाचे औषधही सतत होणाऱ्या खोकल्यावर उपयुक्त आहे. डांग्या खोकला झाल्यास ड्रोसेरा 30 घ्यावे.
पाठीवर झोपल्याने किंवा काहीतरी खाण्याने कोरड्या खोकल्यात आराम मिळतो.
घरगुती उपाय
रात्री भोजन केल्यानंतर आणि झोपायच्या आधी एक-दीड ग्लास ताजे पाणी प्यावे. नंतर झोपायच्या १० मिनिटे अगोदर १०० ग्रॅम गूळ खवा गूळ खल्यांनातर मुळीच पाणी पिऊ नये फक्त चूल भरावी,सकाळ पर्यंत सर्दी पडसे बरे होते. डायबिटीज असलेल्या लोकांनी हा उपाय लेकरू नये.
रोज सकाळी ७-८ तुळशीची पाने आणि २ काळी मिरी खाल्याने कधीच सर्दी पडसे होत नाही.

ज्यांना सारखे पडसे होत असते. अशांसाठी एक उत्तम उपाय, ज्या दिवशी हा उपाय करायचा असेल त्या संध्याकाळी साधे हलके जेवण करावे. त्या आधी २-३ मसालेदार व तळलेल्या पदार्थाचे सेवन बंद करावे. संध्याकाळच्या जेवणानंतर २ तासाची रात्री गव्हाच्या पिठात थोडा गूळ टाकून कुटावे. त्यात थोडं तूप टाकून कणके सारखे मळावे. त्याची जाड पोळी लाटून तव्यावर उलटून पलटू कपड्याने दाबून शिकावी चांगली कुरमरीत शेकून झाल्यावर ताजी गरम खावी त्यानंतर पाणी पिऊ नये.

पादेलोनाचा एक खडा आगीत तापवावा. नंतर चिमट्याने धरून अर्धा पेला पाण्यात बुडवून काढून घ्यावा. नंतर ते पाणी पिऊन घ्यावे.
१०ग्रॅंम आल्याचा रस, १०ग्रॅंम मधात गरम करून दिवसातून २ वेळा प्यावे. दमा, खोकला यास उत्तम औषध आहे. आंबट खाऊ नये.
डाॅ सोनाली सरनोबत
9964946918
9916106896

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.