खानापूर तालुक्यात 3 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शनिवार दि. 18 जुलैपासून दररोज दुपारी 2 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत तालुक्यात “लॉक डाऊन” जारी असणार आहे.
खानापूर तालुक्यात आज शुक्रवारी 3 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने तालुका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तालुक्यातील सर्व व्यवहार दुपारी 2 नंतर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शनिवार दि. 18 जुलैपासून होणार असून तालुक्यातील व्यवहार सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेतच सुरू राहतील, असा आदेश काढण्यात आला आहे. खानापूर तालुका पंचायत सभागृहामध्ये आज शुक्रवारी खानापूर तालुक्याच्या आमदार अंजलीताई निंबाळकर यांच्या उपस्थितीत व्यापारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. सदर बैठकीत चर्चेअंती तालुक्यातील खानापूर नगरपंचायत व ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी दुपारी 2 नंतर तालुक्यातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोशल डिस्टंसिंगचे पालन करून आणि मास्कचा वापर करून ही बैठक पार पडली.
खानापूर तालुक्यातील लोंढा गावामध्ये पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3 झाली आहे. गोव्याहून लोंढेमध्ये आलेल्या संबंधित व्यक्तीला होम काॅरंटाईन करण्यात आले होते. त्याचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आता लोंढा गावात सतर्कता बाळगण्यात येत आहे.
बेलगांव शहर में भी कोरोना संक्रमितो की संख्या तेज़ी से बढ़ रही हैं उससे जनता में भय बढ़ रहा हैं
बेलगाम के जनप्रतिनिधियों को भी इसी तरह आगे आकर कोई ठोस निर्णय लेना चाहिए,
इस सोमवार से 7 दिन तक पूर्ण लॉक डाउन और उसके बाद 7 से 2 बजे तक बाजार को खोलना समय की मांग हैं