गोकाकामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे गोकाक तहसीलदारांनी जुलै 13 तारखेपर्यंत रोज अर्धा दिवस लॉक डाऊन करण्याची घोषणा केली आहे.
34 वर्षाच्या एका महसूल कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे तहसील कार्यालय सील करण्यात आले आहे.
पहाटे 5 ते दुपारी 1 वाजेपर्यंत गोकाकामधील व्यवहार सुरु राहणार आहेत.दुपारी एक नंतर पहाटे पाच पर्यंत गोकाकामध्ये लॉक डाऊन राहणार आहे.गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत.
कॅम्प आणि अथणी पोलीस स्टेशन देखील कोरोनामुळे सील करण्यात आले होते.आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गोकाक दररोज अर्धा दिवस लॉक डाऊन करण्याची वेळ आली आहे.
बेळगाव जिल्ह्यात आकडा चारशे पार झाला असून राज्याची देखील 30 हजार कडे वाटचाल सुरू आहे त्यामुळं बेळगाव शहर देखील लॉक करतात का याकडे लक्ष लागले आहे.