Friday, April 26, 2024

/

कारचा नंबर आहे 2023 आहे खास उद्दिष्ट

 belgaum

अंधश्रद्धा निर्मूलना बरोबरच पुढील 2023 सालच्या निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा सत्तेवर आणण्याचे आपले ध्येय स्पष्ट करताना केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी आज सोमवारी सदाशिनगर स्मशानभूमीत आपल्या केए 49 एन 2023 नंबर प्लेटच्या नव्या कोऱ्या कारगाडीचे विधिवत पूजन केले.

कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी हे समाजातील अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी दरवर्षी स्मशानभूमीमध्ये विविध उपक्रम राबवत असतात.

स्मशान भूमीत एक रात्र वास्तव्यास राहणे वगैरे उपक्रम करणाऱ्या आमदार सतीश जारकीहोळी यांनी यावेळी अंधश्रद्धा निर्मुलना बरोबरच आपला राजकीय उद्देश स्पष्ट करण्यासाठी हेतुपूर्वक आपल्या नव्याकोऱ्या फॉर्च्यूनर या कार गाडीच्या पूजनाचा कार्यक्रम आज सकाळी सदाशिवनगर स्मशानभूमी आयोजित केला होता.

 belgaum
Satish jarkiholi

जारकीहोळी यांनी आपल्या कार गाडीच्या नंबर प्लेटवरील क्रमांक हेतूपूर्वक केए 49 एन 2023 ठेवला आहे.

येत्या 2023 साली लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीमध्ये राज्यात पुन्हा काँग्रेसला सत्तेवर आणणे हे सतीश जारकीहोळी यांचे ध्येय आहे. केए 49 एन 2023 क्रमांकाची आपली गाडी पाहून सर्वांना राज्यातील पुढील लोकसभा निवडणूक जिंकण्याचा आपला निर्धार लक्षात रहावा, असे सतीश जारकीहोळी यांना वाटते.

पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर उपस्थितांनी नव्या कार गाडीवर पुष्पवृष्टी करून आनंद व्यक्त केला. केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या कार गाडी पूजन कार्यक्रमाप्रसंगी विविध मठांच्या प. पू. स्वामीजींसह काँग्रेसचे नेते, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.