मागील अनेक महिन्यांपासून रेशन दुकानदारांना कमिशन देण्यात आले नाही. कोरोना काळातही दिवस-रात्र आपली सेवा बजावली आहे. लोकांच्या मदतीसाठी त्यांनी सदैव प्रयत्न केले आहेत. मात्र सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे रेशन दुकानदार एक ऑगस्ट पासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही संप करू असे सांगण्यात येत आहे. रेशन दुकानदार यांच्या संपर्कात मोठ्याप्रमाणात जनता असते. त्यांच्या सोयीसाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मात्र कोरोना पासून बचाव करण्यासाठी आम्हाला कोणत्याच प्रकारे मदत करण्यात आली नाही. तरी देखील आम्ही इमानेइतबारे सेवा बजावत आहोत.
आम्हाला अजूनही कमिशन देण्यात आले नाही. मागील चार महिन्यांपासून आम्ही कमिशनच्या प्रतीक्षेत आहोत. मात्र याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आम्ही एक ऑगस्टपासून संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागील चार महिन्यांपासून आम्हाला कमिशन मिळाले नसल्याने आमचे कुटुंब व आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र गोवा या राज्यात 220 रुपये प्रति क्विंटल कमिशन देण्यात येते. मात्र कर्नाटकात केवळ शंभर रुपये कमिशन आहे. तेही देण्यास टाळाटाळ सुरू करण्यात येत आहे.
त्यामुळेच आम्ही एक ऑगस्ट पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आमचा उद्देश नागरिकांना त्रास द्यायचा नाही. मात्र सरकारने ही आमच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. यामुळेच आम्ही एक ऑगस्ट पासून संपावर जाण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. कोरोना काळात आम्ही सेवा बजावत असताना राज्यात बारा कर्मचाऱ्यांना कोरोना ची बाधा झाली आहे.
त्यामुळे त्यांना पन्नास लाख रुपये विमा देण्याची गरज असून याकडे राज्य सरकारने लक्ष देऊन आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी या बैठकीत करण्यात आली आहे. यावेळी राजशेखर तळवार नारायण कालकुंद्री मारुती आंबोलकर सुरेश राजूरकर दिनेश बागडे प्रभू पाटील पिंटू पाटील यांच्यासह आदी बैठकीत उपस्थित होते.