यु ट्यूब चॅनेल मध्ये बातमी प्रसारित करतो असे सांगत महिलांना सोबत घेऊन हनी ट्रॅप प्रकरणी पाच लाखांची मागणी करत ब्लॅक मेल करणाऱ्या पाच जणांच्या टोळक्याला धाड टाकत रंगेहाथ पकडले आहे.दोन महिलांना सोबत घेऊन हनी ट्रॅपच्या माध्यमातून ब्लॅक मेल करणाऱ्या तीन महिला आणि दोन पुरुषांना अटक करण्यात बेळगाव पोलिसांनी यश मिळवले आहे.
अथणीचा सदाशिव चिप्पलकट्टी,बेळगाव नेहरू नगर येथील रघुनाथ धुमाळे,सौन्दत्तीची गौरी लमानी, मंजुळा जत्तन्नवरव सौन्दत्ती तालुक्यातील उगरगोळ गावची संगीता कणकीकोप्प यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ब्लॅक मेलरबजमखंडी येथील एका व्यक्तीची ओळख करून घेऊन त्याला लॉज कडे बोलावतात व लॉज मध्ये बोलावून त्याच्याशी चर्चा करतात व त्याच्याशी सलगी करून त्याला हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढतात. तेवढ्यात प्राईम न्यूज यु ट्यूब चॅनेलचे प्रतिनिधी म्हणून लॉजला येतात महिलां सोबत त्या जमखंडी येथील व्यक्तीचा व्हीडिओ काढला जातो व तो व्हीडिओ व संभाषण ऑडिओ क्लिप दाखवत भेडसावत पैश्याचा तगादा लावला जातो .
व्हीडिओ यु ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून प्रसारित करण्याची धमकी देत सुरुवातीला दहा लाख रुपयांची मागणी केली जाते त्या नंतर व्यवहार पाच लाखाला ठरवला जातो. त्यावेळी जमखंडीच्या त्या व्यक्तीकडून पोलिसांना याची कल्पना दिली जाते त्या नंतर माळ मारुती पोलिसांनी लॉज वर धाड टाकून पाच जणांना अटक केली जाते.
या नंतर झालेल्या पोलीस चौकशीत हनी ट्रॅप समोर येते. माळ मारुती पोलिसांनी या हनी ट्रॅप ब्लॅक मेलर कडून प्राईम न्यूज यु ट्यूब चॅनेलची ओळखपत्र मोबाईल फोन जप्त केले आहेत.मार्केट ए सी पी एन व्ही बरमनी यांच्या नेतृत्वाखाली लॉज वर धाड टाकत माळ मारुती पोलीस निरीक्षक बी आर गड्डेकर यांनी ही कारवाई केली आहे.