हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाज आणि त्यांचे अनुभव हे कधीही वाया जाणारे ठरताहेत. या वर्षी मान्सून जोरदार बरसेल अशी भाकीत हवामान खात्याने केली होती. मात्र ही भाकित आता फोल ठरू लागले आहे. मागील आठ दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे तर तीन ते चार दिवसांपासून श्रावण मासातील पाऊस अनुभवयास मिळत आहे. त्यामुळे अनेकांतून आश्चर्य तर शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
पाऊस पडावा आशा शेतकऱ्यांना लागून राहिले आहे. सध्या या पिकांना पोषक वातावरण असले तरी जोरदार पावसाची नितांत गरज आहे. याचबरोबर अनेक ठिकाणी भात लागवडीची कामे रेंगाळली आहेत. अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत मात्र अधूनमधून रिमझिम पाऊस पडून गायब होत आहे. सध्या पेरणी केलेली भात पिके चांगली आहे तर बटाटा पीक व लागवडीच्या भात पिकाला जोरदार पावसाची गरज आहे.
मात्र कधी ऊन कधी पाऊस असे वातावरण निर्माण झाल्याने श्रावण मासात असल्याचा अनुभव पंधरा दिवस आधीच येऊ लागला आहे. जुलै महिन्यात जोरदार पाऊस पडेल असे सांगण्यात आले होते. मात्र सुरूवातीचे दोन दिवस झाले तरी पावसाचा पत्ता नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या पिकांना पावसाची नितांत गरज आहे. त्यामुळे पाऊस येऊ दे रे बाबा अशीच मागणी शेतकर्यांतून व्यक्त करण्यात येत आहे.