बेळगाव तालुक्यातील रोप लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या पावसाने चांगली साथ दिली असून रोप लागवडीचे काम जोरदार सुरू आहे. बेळगाव तालुक्यातील उत्तर भागात रोप लागवडीचे काम जोमात सुरू आहे. त्यामुळे शेतकरी अजूनही कामात आहे. ज्याठिकाणी भात पेरणी झाली आहे ही पिके जोमात आली आहेत.
सध्याचे वातावरण पोषक निर्माण झाले असून शेतकऱ्यांना दिलासादायक अशीच बाब सध्या आहे. पावसाने अशीच साथ द्यावी अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे. सध्या टीलर मारून चिखल करण्याकडे शेतकरी गुंतला आहे.
शेवटच्या टप्प्यात रोप लागवडीचे काम असून या दृष्टिकोनातून शेतकरी कामाला लागले आहेत. अनेक ठिकाणी भात पेरणी झाली आहे तर दक्षिण भागात भात पीक जोमात आले आहे.
सध्या कोळपणीचे काम व इतर कामे करण्याकडे शेतकरी गुंतला आहे. बेळगाव तालुक्यातील पश्चिम व उत्तर भागात रोप लागवडीचे काम हाती घेण्यात येते तर पूर्व व दक्षिण भागात भात पेरणी करण्यात येते. भात पेरणी केलेले पीक जोमात आले आहे. त्यामध्ये भांगलण व इतर कामे शेतकरी करू लागले आहेत तर पश्चिम व उत्तर भागात शेतकरी रोप लागवडीच्या कामात गुंतला आहे.
सध्या रोप लागवडीचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्या दृष्टिकोनातून शेतकरी तयारीला लागले आहेत. येत्या आठवड्याभरात संपूर्ण रोप लागवडीचे काम संपण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 85 टक्के पेरणीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे समजते.