बेळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी दोघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
मात्र संबंधित मृतदेहावर रविवारी दुपारी 1 वाजता अंतिम संस्कार करण्यासाठी वाट पहावी लागली. शनिवारी दुपारी एक वाजता मयत झालेल्या पोजिटिव्ह रुग्णांवर कोविड नियमानुसार अंतिम संस्कार करण्यात आले.
प्रकृती खालावल्याने कुडची तालुका रायबाग येथील 70 वर्षीय वृद्धाला शनिवारी दाखल करण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्या असून त्याचा काल मृत्यू झाला आहे तर वीरभद्र नगर बेळगाव येथील एका 48 वर्षीय इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एका दिवसात या दोन घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण वाढत चालले आहेत. तशी भीतीही वाटू लागली आहे.
दुपारी पर्यन्त या दोघांचाही मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोविड मार्गसुची अनुसार पॅक करून ठेवण्यात आले होते. याबाबत बिम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनायक दोस्तीकोप यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील असे सांगितले म्हटले होते मात्र दुपारी हे अंतिम संस्कार झाले.