Monday, January 20, 2025

/

बेळगाव ते सावंतवाडी व्हाया चंदगड रामघाट रोड रेल्वेमार्ग लवकर व्हावा

 belgaum

चंदगडचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांची भेट घेतली. यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघातील व कोल्हापूर जिल्ह्यातील निगडीत प्रश्न मांडण्यात आले. काही वर्षांपूर्वी बेळगाव ते सावंतवाडी व्हाया चंदगड रामघाट रोड रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाले होते, सदरचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयात रखडलेला असून हा प्रस्ताव लवकर मार्गी लावावा. हा रेल्वे मार्ग बेळगाव व चंदगड परिसरातील शेती व औद्योगिक क्षेत्रासाठी खूप महत्वाचा ठरेल. तसेच कोल्हापूर, निपाणी, संकेश्वर, बेळगाव,धारवाड व हुबळी या रेल्वे मार्गाची मागणी तत्कालीन खासदार स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी मांडली होती. याला अनसुरून आपण याला मंजुरी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या रेल्वेमार्गामुळे कोल्हापूर, बेळगाव, धारवाड व हुबळी ही औद्योगिक केंद्रे एकमेकांशी जोडली जातील. येथील उद्योगधंदे एकमेकांवर अवलंबून आहेत त्यामुळे हा रेल्वे मार्ग झाला तर येथील औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असे मत राजेश नरसिंगराव पाटील यांनी व्यक्त केले.

काही दिवसांपूर्वी दोन्ही राज्याच्या पाठबांधरे विभागाचे मंत्री व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे राकसकोप धरणामुळे होणाऱ्या जमिनीच्या नुकसानी बाबत व तिलारी धरणाच्या तीन रखडलेल्या बंधाऱ्यांच्या संदर्भात बैठक पार पडली होती , त्या अनुषंगाने तुडये, मळवी व परिसरातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना लवकर नुकसानभरपाई मिळावी तसेच धरणातील गाळ काढावा अशी मागणीही त्यांनी केली.

तसेच तिलारी धरणाच्या तीन रखडलेल्या बंधाऱ्यांच्या संदर्भात बेळगाव येथे बेळगावचे पालकमंत्री व पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी, आमदार अनिल बेनके व आमदार लक्ष्मी हेब्बाळकर तसेच महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक या सर्वांची बैठक आयोजित करावी आणि तिलारी धरणातील रखडलेले तीन बंधारे लवकर पूर्ण व्हावे यासाठी आपण व कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक या सर्वांनी मिळून केंद्र सरकारकडे मागणी करावी.

दोन्ही राज्याच्या समन्वयातून ही धरणे पूर्ण करावीत व धरणाचे पाणी चंदगड मधील सात ते आठ गावांना व मार्कंडेय नदीच्या माध्यमातून बेळगाव परिसरातील गावांना मिळावे अशी मागणी केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.