बेळगाव शहरात कोरोनाची दहशत वाढत असून आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित मृत्यूचा आकडा वाढून तीन झाला आहे.
या अगोदर हिरेबागेवाडी येथील 84 वर्षीय वृद्ध महिला व अथणी येथील 42 वर्षीय पुरुषाचा देखील मृत्यू झाला होता.आता शास्त्री नगर गुडस शेड रोड येथील 72 वर्षीय वृद्ध देखील कोविड मुळे दगावला आहे.
मयत वृद्ध गेल्या 17 जून रोजी तो बंगळुरू हुन बेळगावला परतला होता बुधवारी त्याचे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले आहे.बेळगाव येथील गुडस शेड रोड स्वरूप सिनेमा जवळील रहिवाशी होता. 21 जून रोजी त्यांना आजाराची लक्षणे दिसल्याने त्यांना शहापूर येथील येथील खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते त्यांनतर काल मंगळवारी छातीत दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी बिम्स मध्ये दाखल करण्यात आले होते बुधवारी त्यांचा मृत्यू झाला आहे.
मयत वृद्धाचा घश्याचे नमुने गुरुवारी सकाळी घेण्यात आले रिपोर्ट येण्याआधी त्यांचे निधन झाले त्या नंतर सायंकाळी रिपोर्ट येणार होता.मयत वृद्धाच्या 9 कुटुंबातील सदस्याने नमुने घेण्यात आले असून ते खाजगी इस्पितळात क्वारंटाइन आहेत.या घटनेमुळे गुडसशेड रोड भागांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.