हेस्कॉम कार्यालयात कोरोनाचा शिरकाव
मनापानांतर हेस्कॉम कार्यालय सीलडाऊन करण्यात आले आहे
शहरात कोरोनाने आता कुठलीही जागा रिक्त ठेवली नाही. मनपा कार्यालयापाठोपाठ आता हेस्कॉम कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
शहरातील रेल्वे स्थानकाजवळील कार्यालयात आणि नेहरूनगर येथील विभागीय कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे यांच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे.
या दोन कार्यालयात आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमुळे ही दोन्ही कार्यालये सीलडाऊन करण्यात आली आहेत. सोमवार पर्यंत ही कार्यालये बंद ठेवण्यात येणार असून ग्राहकांनी ऑनलाईन आपली बिले भरावीत अशी सूचना करण्यात आली आहे.
आजपासून केवळ ३ दिवस ही कार्यालये बंद राहणार असून त्यानंतर मात्र पुन्हा रीतसर ही कार्यालये सुरु होतील.