बेळगावचे मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मा. आर. जे. सतीश सिंग यांची अन्यत्र बदली झाल्यामुळे बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने आयोजित त्यांचा निरोप समारंभ आज गुरुवारी दुपारी पार पडला.
शहरातील न्यू कोर्ट कॉम्प्लेक्स येथील वकील समुदाय भवनमध्ये आज गुरुवारी दुपारी मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मा. आर. जे. सतीश सिंग यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. ए. जी. मुळवाडमठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाप्रसंगी व्यासपीठावर सरचिटणीस ॲड. आर. सी. पाटील, उपाध्यक्ष ॲड. सी. टी. मजगी आणि संयुक्त सचिव ॲड. शिवपुत्र फटकळ उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर न्यायाधीश आर. जे. सतीश सिंग यांचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कारानंतर ॲड. ए. जी. मुळवाडमठ, ॲड. मारुती जिरली, ॲड. एस. बी. शेख आदींनी आपल्या भाषणात न्यायमूर्ती सतीश सिंग यांच्या कार्याचा गौरव करून पुढील कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना न्यायाधीश ए. जे. सतीश सिंग यांनी बेळगाव येथील कारकिर्दीत बार असोसिएशनने केलेल्या सहकार्याबद्दल असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना धन्यवाद दिले. अतिशय छान असणारा येथील अनुभव कायम स्मरणात राहील असा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी ॲड. मारुती कामाणाचे, आर. पी. पाटील, श्यामसुंदर पत्तार, गजानन पाटील, प्रमिला हंपण्णावर, प्रभाकर पवार, कल्मेश मायाणाचे आदींसह बेळगाव बार असोसिएशनचे बहुसंख्य सदस्य वकील उपस्थित होते.