Saturday, January 25, 2025

/

येणारी परिस्थिती नागरिकांना परवडणारी नाही

 belgaum

संपूर्ण जगात कोरोनामुळे मोठी उलथापालथ होत आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चाललेला पाहून सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू केला. जवळपास अडीच महिने कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात आला. नागरिकांनीही यावेळेत संयम दाखविला. अत्यावश्यक सेवा वगळता संपूणर्पणे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. मात्र अडीच महिन्यानंतर देशात अनेक ठिकाणी “अनलॉक” प्रक्रिया सुरु झाली. आणि यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली.

रुग्णसंख्येत वाढ होत असलेली पाहून काही ठिकाणी प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या. आणि काही ठिकाणी लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले. पर्यायाने कर्नाटक सरकारनेही कडक नियम आणि अटींसह काही ठिकाणी “अनलॉक” प्रक्रिया राबविली. पण यानंतर मात्र बघता बघता रुग्णसंख्या अतिशय वेगाने वाढू लागली. परिणामी वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता काही तालुक्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले.

तर शहरी भागातही रुग्णसंख्या वाढत चालली. नागरिक आणि प्रशासनानेही याबाबतीत दुर्लक्षाचे धोरण राबविले. त्यानंतर रुग्णसंख्येप्रमाणे रुग्णांच्या मृत्यूमध्येही वाढ होत गेली. आणि नागरिकांमध्ये पुन्हा लॉकडाऊनची गरज असल्याचे बोलले गेले. परंतु प्रशासनाने मात्र लॉकडाऊन बाबतीत ठोस नकार दर्शविला. पर्यायाने जनतेने स्वतःच लॉकडाऊन करण्याचे धोरण अवलंबिण्यास सुरुवात केले.

 belgaum

अनेक शहरी भागात आणि उपनगरात रुग्ण आढळत असल्यामुळे संबंधित ठिकाणी सीलडाऊन करण्यात आले. त्यानंतर हळूहळू रुग्णांच्या मृत्यूमध्येही वाढ होत गेली. आणि याची धास्ती नागरिकांमध्ये दिसून येऊ लागली. प्रत्येक वेळी नागरिक आणि अनेक संस्थांकडून लॉकडाऊनची मागणी करण्यात आली. परंतु वेळोवेळी लॉकडाऊनची गरज नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान अनेक व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन स्वयंस्फूर्तीने व्यवसाय बंद करण्याची वेळ ठरवून घेतली. सराफी व्यावसायिकांनी ४ वाजता, लोखन्डवाला असोसिएशनतर्फे ६ वाजता आपले व्यवसाय बंद करण्याचे ठरविले आहे. यासोबतच खडेबाजार येथे रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने हा एरिया सीलडाऊन करण्यात आला. यामुळे बापट गल्लीतील इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशननेही सायंकाळी ६ वाजता आपले व्यवहार बंद करायचे ठरविले.

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रुग्णसंख्येमुळे आता नागरिक धास्तावून गेले आहेत. कोरोनाचा प्रसार हा वेगाने फैलावत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन व्हावे अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. आज बेळगावची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. अनेक रुग्णांचा यामध्ये बळी जात आहे. ठिकठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. यामुळे एकप्रकारची दहशत निर्माण झाली आहे.

Belgaum cantainmen zone
Belgaum cantainmen zone

नागरिक स्वतःहून लॉकडाऊनची मागणी करत असूनही सरकार लॉकडाऊनविषयी ठोस निर्णय घेण्यात का कचरत आहे? असा सवाल नागरिकांमधून व्यक्त होत आहे. कोरोनाचा फैलाव येत्या काळात आटोक्याबाहेर जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. श्रावण मास असल्यामुळे सणासुदीचा काळ असतो. बेळगावसारख्या ठिकाणी अतिशय रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा नागरिकांना संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. अशातच प्रसारमाध्यमातून कोरोनाच्या उपचाराच्या खर्चाची माहिती देण्यात येत आहे. आधीच आर्थिक संकटाला सामोरे गेलेल्या नागरिकांना लॉकडाऊनमुळे अधिक आर्थिक भार सोसावा लागत आहे. आणि अशातच कोरोनाचा फैलाव वाढत गेला तर नागरिक उपचार करण्यासाठीही कमकुवत होतील.

यामुळे यापुढे होणारा धोका लक्षात घेऊन वेळीच सरकारने योग्य धोरणांचा अवलंब करावा, आणि समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांचा विचार करावा. अन्यथा बेळगावच्या नागरिकांना येत्या काळातील धोका निभावण्यासाठी हतबल होण्यापलीकडे कोणताच मार्ग उरणार नाही. शिवाय आलेली परिस्थिती हाताळणे परवडणारीही नाही. या सर्व परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने वेळीच योग्य पावले उचलणे आता महत्वाचे आहे.

 belgaum

1 COMMENT

  1. Paristhiti evdhi chintajnak asunhi microfinance company garib jntela emi Sathi khup jast pressure karat ahet …..hyachihi prashasanane dakhal ghetli pahije …..garib lokanchi kame band ahet tyana ration anayla Sudha paise nait ani he microfinance walle emi bharaypach pahije ashi dhamki det ahet ……ikde shasnane laksh dyawe……samanya manus hya takrari gheun kuthe janar ……

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.