रोजच्या रोज बेळगाव शहर आणि परिसरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढतंच चालला आहे शहरातील कोणताही भाग किंवा उपनगर कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही असा राहिला नाही.शासकीय अधिकारी नर्सेस डॉक्टर्स लॅबरोटरी मधील कर्मचारी आमदार आणि अन्य नागरिक असा चतुरस्त्र कोरोनाचा फैलाव चालू आहे त्यामुळे नागरिकांत एक दशहत निर्माण झाली आहे.
मनपाच्या कार्यालयात कर्मचारी कोरोना बाधित आढळल्याने मनपाचे एक कार्यालय सील करण्यात आले व कॅम्प पोलीस स्टेशन सील करून त्याच बरोबर काही पोलिसांना होम क्वांरंटाईन करण्यात आलंय त्याचबरोबर गेल्या आठवडा भरात शहरात सात हुन अधिक जण कोरोना मुळे दगावले आहेत पण बेळगावातील बहुसंख्य आढळणारे रुग्ण हे सौम्य कोरोना बाधित आहेत ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब आहे
परंतु पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी जिल्ह्यातील पाच तालुक्या पुरता लॉक डाऊन जारी केला आहे खर तर बेळगाव शहर आणि तालुक्यात लॉक डाऊनची नितांत गरज आहे अशी जाणकारांची मागणी आहे मात्र जिल्हाधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष केलेलं दिसत आहे.
बेळगाव शहर पोलीस प्रयत्न पूर्वक सायंकाळी सात वाजता बेळगाव शहरातील दुकाने व व्यवहार बंद करण्यास भाग पाडत आहेत आजू बाजूचे तालुके बंद असल्याने बेळगाव मार्केट मधील व्यवहार मंदावले आहेत आणि जनतेची मानसिकता लॉक डाऊन साठी तयार असताना डी सी यांनी याबाबत विचार करणे गरजेचे आहेत.
सात वाजता लहान मोठे हॉटेल दुकान चालकांना पूर्व कल्पना न देता बंद करण्यापेक्षा अघोषित बंद करण्या पेक्षा रीतसर लॉक डाऊनची घोषणा करणे गरजेचे बनले आहे.दोन दिवसांत एवढ्या मोठ्या प्रमाणात बेळगावात पोजिटिव्ह रुग्ण सापडले असल्याने जर लॉक डाऊन नाही केला तर बाधितांची संख्या मोठया प्रमाणात वाढली तर प्रशासन यासाठी तयार आहे का? हा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.
डॉक्टर आणि पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने यंत्रणा देखील ढिली पडली आहेत अश्या परिस्थितीत कोरोनाची चैन तोडायची असेल तर एक आठवडा किंवा त्याहूनहो अधिक मोठा कडक लॉक डाऊन करणे गरजेचे बनले आहे आता चेंडू डी सी यांच्या कोर्टात आहे.