वाढत्या कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाच्या आकड्याने भयभीत झालेल्या बेळगावकर जनतेतून लॉक डाऊन करण्याची मागणी सातत्याने पब्लिक डिमांड म्हणून समोर येत असताना बेळगाव शहर आणि तालुका लॉक डाऊन करणार की नाही याबाबत सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे . बेळगाव जिल्ह्यातील अर्धेहून अधिक तालुके लॉक डाऊन आहेत या शिवाय शेजारील महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा एका आठवडा कडक लॉक डाऊन असणार आहे धारवाड हुबळी जिल्हा तर अगोदरच लॉक झालं आहे या नंतर बेळगाव जिल्हा लॉक करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
बेळगाव जिल्हा पालक मंत्री रमेश जारकीहोळी बेळगावात अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत या बैठकीत बेळगाव शहर आणि तालुका किमान एक आठवड्यासाठी कडक लॉक करावं का? दुपारी दोन नंतर व्यवहार बंद करावेत याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
बेळगाव शहरातील उपनगर असू देत किंवा गल्लोगल्ली असूदेत कोरोनाचा प्रभाव सगळीकडे पसरला आहे त्यामुळे बेळगाव शहर लॉक करण्याबाबत या बैठकीत चर्चा होऊशकते . या बैठकीत संपूर्ण जिल्हाच आठवड्यासाठी लॉक करावा का ? कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाची पुढील स्ट्रॅटेजी ठरवली जाणार आहे .
बेळगाव शहर आणि तालुका किंवा जिल्ह्यात कोरोना बाबत जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्या बाबत जिल्हा प्रशासन आरोग्य खाते आणि पालक मंत्री काय भूमिका घेतात हे देखील पहावे लागणार आहे. रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ आणि पालक मंत्री रमेश जारकीहोळी या बाबत आपापली मते मांडणार आहेत. रमेश जारकीहोळी अधिकारी आणि जनतेची मत जाणून घेणार असून निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत
.