बेळगाव जिल्ह्यात आणि शहरात गेल्या आठवडा भरात कोरोनाचे रुग्ण आढळले असल्याने शहरात देखील कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत . १ जुलै नंतर शहरात १९ ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत
शहरात अनेक ठिकाणी एक आणि एक हुन अधिक रुग्ण सापडले आहेत तर गेल्या आठवड्यात शास्त्रीनगर भागात एका महिलेचा देखील कोरोना मुळे मृत्यू झाला होता.
बेळगावात या भागात आहेत कोरोना रुग्ण
काकती , हनुमान नगर, हिंडलगा, वंटमुरी कॉलनी, भारत नगर, उज्वल नगर, नेहरू नगर, सह्याद्री नगर, अंनगोळ, सुभाषनगर, माळी गल्ली खासबाग ,मजगाव ,सदाशिवनगर, भोवी गल्ली, महांतेश नगर, शास्त्री नगर, न्यू गुड्स शेड रोड ,वीरभद्र नगर ,वडगाव, हिंदवाडी
बेळगाव शहराचं नव्हे तर तालुक्यात देखील कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. बेळगाव जिल्ह्यात सध्या १०० हून अधिक ऍक्टिव रुग्ण आहेत तर आता पर्यंत एकूण ४५० रुग्ण झाले आहेत