बेळगावात आमदार,पोलीस कॉन्स्टेबल,डॉक्टर नर्स नंतर आता पोलिस निरीक्षक देखील कोरोना पॉजिटीव्ह झाले आहेत.
कोरोनाने सगळीकडे हातपाय पसरले असून पोलीस खात्यात देखील त्याने शिरकाव केला आहे.
निपाणीच्या सिपीआयना कोरोनाची बाधा झाली आहे.लॉक डाऊन सुरु झाल्यापासून कोगनोळी चेक पोस्टसह अनेक ठिकाणी निपाणी सिपीआय सेवा बजावत होते.आज त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निश्चित झाले आहे.
गेल्या चार दिवसांपासून सीपीआय होम क्वारंटाईनमध्ये आहेत.सिपीआयना कोरोनाची बाधा झाली असली तरी निपाणी पोलीस स्टेशन सील करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.
सिपीआय ना कोरोनाची बाधा झाल्याच्या वृत्ताला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.