२०१६ साली एचआयव्हीग्रस्त महिलांसाठी स्थापन केलेल्या आश्रय फौंडेशनची स्थापना करण्यात आली. संस्था स्थापन करणाऱ्या श्रीमती नागरत्ना एस. रामगौडा यांच्या कार्याची दखल घेत द इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आश्रय फौंडेशनची नोंद करून त्यांना गौरविण्यात आले.
संपूर्ण कर्नाटक तसेच महाराष्ट्रातही संस्था कार्यरत असून, हि एकमेव संस्था आहे जिथे एचआयव्हीग्रस्त मुली, महिला, निराधार स्त्रियांना आधार दिला जातो आणि त्यांची काळजी घेतली जाते. देणगीदारांच्या सहकार्याने आश्रय संस्था एकूण आठ ठिकाणी हा उपक्रम राबवत आहे.
या संस्थेसाठी झटणाऱ्या श्रीमती नागरत्ना एस. रामगौडा या गेली २३ वर्षे अशा अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग दर्शवितात. या कार्याची दखल घेऊन द इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्सने आश्रय फौंडेशनची नोंद करून गौरविले आहे.
या गौरवाबद्दल बोलताना श्रीमती नागरत्ना म्हणाल्या कि या व्यासपीठावर पोहोचून आम्हाला अत्यानंद झाला आहे. आश्रय फौंडेशनचे संचालक, श्रीमती अर्चना पद्मन्नावर, श्रीमती प्रमिला काद्रोळी, सल्लागार, स्वयंसेवक, देणगीदार आणि या कार्यासाठी पाठबळ देणाऱ्या सर्वांचा मिळालेल्या या यशात आणि गौरवात मोलाचा वाटा आहे. या सर्वांच्या सहकार्याबद्दल श्रीमती नागरत्ना यांनी आभार व्यक्त केले.