कोरोना महामारीमुळे अनेक सण उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमावर गदा आली आहे. मात्र बेळगावात मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करणाऱ्या गणेशोत्सवावर देखील संक्रांत प्रशासन घालू पाहत आहे. मात्र यावर्षी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय अनेकांनी घेतला आहे.
तर यासाठी नागरिक ही सज्ज झाले आहेत. दरम्यान प्रशासन याला आडकाठी घालू पाहत आहे. त्यामुळे गणेशोत्सव आणि भाविकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यासाठी सारे सज्ज झाले आहेत. बेळगाव जिल्ह्यात गणेशोत्सवाला शंभर वर्षांची परंपरा आहे. मात्र कोरोना महामारीमुळे अनेक उत्सवांवर संकट निर्माण झाले आहेत. तरीदेखील गणेश भक्त गणेश उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान कुंभार शाळांमध्ये गणेश मूर्तींना रंगरंगोटीचे काम सुरू करण्यात आले आहे.
हे काम अंतिम टप्प्यात आले असून शाळांमध्ये घाईगडबडीचे चित्र सध्या दिसू लागले आहे. यावर्षी लहान मूर्ती साकारून गणेश उत्सव साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्या दृष्टिकोनातून हालचाली गतिमान झाल्या आहेत. यावर्षी अनेक मंडळांनी सामाजिक भान ठेवत सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून ही गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गोरगरिबांना मदत करून गणेशोत्सव साजरा करू असे सांगण्यात येत आहे.
मात्र गणेशोत्सव हा कोरोना नियमांचे पालन करुन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी अनेक मंडळांनी केली आहे. त्या दृष्टीकोनातून आता यापुढे गणेश उत्सव साजरा करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. गणेश उत्सव हा वर्षातील एक आनंद आणि भक्तीमय वातावरण निर्माण करणारा सण म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच भाविकांचा ओढा गणेशोत्सवाकडे अधिक असतो.
बेळगावात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यावर्षी चित्ररथ मिरवणूक साध्या पद्धतीने करण्याच्या दृष्टिकोनातून देखील अनेक मंडळांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र प्रशासन याला आडकाठी घालू पाहत आहे. त्या अनुषंगाने देखील परवानगी मागण्यासाठी अनेक भक्तगण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या वाजवताना दिसत आहेत. प्रशासन परवानगी देणार की नाही याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.