कोरोना प्रादुर्भाव व लॉक डाऊनच्या काळात देखील विकासकामांचा धडाका लावून जनसेवा करणारे बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे ते होम काॅरंटाईन झाले आहेत.
डोक्यावर कोरोनाची टांगती तलवार असतांनाही आमदार कौजलगी यांनी लाॅक डाऊनच्या काळातही आपल्या मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावून जनसेवा सुरू ठेवली होती.
तथापि खबरदारी म्हणून त्यांनी नुकतीच कोरोना चाचणी दिली होती. या चांचणीचा अहवाल हाती आला असून त्यात आमदार महांतेश कौजलगी यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या उत्तर बेळगावचे आमदार अनिल बेनके होम क्वांरंटाइन आहेत त्यानंतर हे जिल्ह्यातील दुसरे आमदार आहेत जे पोजिटिव्ह आहेत.