कोरोना पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या दहावी परीक्षा अत्यंत सुरक्षेच्या उपाययोजनांसह पार पडल्या. शिक्षण क्षेत्रातील महत्वाचा टप्पा मानला जाणाऱ्या या परीक्षांचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल, अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी आज दिली आहे.
बंगळूरमधील मूल्यमापन केंद्रांना आज सुरेशकुमार यांनी भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. आणि यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हि माहिती दिली आहे.
कोरोनाच्या गडद छायेत विद्यार्थ्यांनी कसोशीने दिलेल्या या परीक्षांचा निकाल विद्यार्थी, पालक तसेच इतर नागरिकांनाही औत्सुक्याचा विषय ठरला आहे.
विद्यार्थी आणि पालकांनी जशी परीक्षांची वाट पहिली होती आता तशीच वाट निकालाचीही पाहावी लागणार असून निकालापर्यंतचा हा अवधी उत्सुकता वाढविणारा ठरणार, हे नक्की!