रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी तुमच्यावर दाखल झालेली तक्रार मागे घेण्यास सांगतो अशी बतावणी करून एका डॉक्टरांकडून 2 लाख रुपयांची रक्कम उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा जणांविरुद्ध गोकाक शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.
भीमशी बरमण्णावर आणि हनुमंत दुर्गण्णावर (दोघेही रा. गोकाक) अशी डॉक्टरांकडून 2 लाख रुपयांची रुपयांची रक्कम उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
भीमंशी आणि हनुमंत यांनी काल बुधवारी गोकाक येथील नवजीवन हॉस्पिटलचे डॉ. श्रीशैल होसमनी या डॉक्टरांना एका रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी तुमच्यावर दाखल झालेली तक्रार मागे घेण्यास सांगतो, मात्र त्याच्या मोबदल्यात तुम्ही आम्हाला 2 लाख रुपये दिले पाहिजेत असे असे सांगून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र डाॅ. होसमनी यांनी पैसे देण्यास नकार देऊन गोकाक शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अम्मीनभावी अधिक तपास करीत आहेत.