शहरातील कोरोनाग्रस्तांची झपाट्याने वाढणारी संख्या लक्षात घेऊन बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात एपीएमसीच्या होलसेल भाजी मार्केटचे निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) केले जाणार आहे. यासाठी येत्या बुधवार दि. 29 आणि गुरुवार दि. 30 जुलै रोजी सलग दोन दिवस एपीएमसी होलसेल भाजी मार्केट बंद राहणार आहे.
शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून एपीएमसी होलसेल भाजी मार्केटचे संपूर्ण सॅनिटायझेशन केले जाणार आहे.
येत्या दि. 29 व 30 जुलै असे सलग दोन दिवस हे सॅनिटायझेशन काम होणार असल्याने या दिवशी भाजी मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे.
तरी शेतकरी आणि व्यापारी बंधूंनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन एपीएमसी सेक्रेटरीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.