बेळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव शहरासह जिल्ह्यात आणखी 27 रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 497 झाली आहे. तसेच आज आणखी दोघांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 14 झाली आहे.
बेळगाव जिल्ह्यात नव्याने आढळून आलेल्या 27 कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये बेळगाव शहर व उपनगरातील 13 जणांसह अथणी तालुक्यातील 11 आणि रामदुर्ग बैलहोंगल व गोकाक तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आज अथणी तालुक्यातील 72 वर्षीय पुरुष आणि गोकाक तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष अशा आणखी दोघांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 14 झाली आहे.
बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने जाहीर केलेल्या वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार सोमवार दि. 13 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगाव जिल्ह्यात एकूण 32,015 संशयित व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 6,278 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 119 आहे.
काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 10,233 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 15,385 आहे. कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 30,719 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 497 नमुन्यांचा वैद्यकीय रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असून मृतांची संख्या 14 इतकी वाढली आहे. जिल्ह्याबाहेरील (बागलकोट) पॉझिटिव्ह रुग्ण 08 आहेत. प्रयोगशाळेत धाडलेल्या नमुन्यांपैकी 26,988 नमुने निगेटिव्ह असून ॲक्टिव्ह केसीस 121 आहेत.
त्याचप्रमाणे 2,646 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 366 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.