बेळगाव जवळील कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असलेल्या पाहिल्या शिनोळी या गावात कोरोंनां धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे.
मूळ गाव कुद्रेमनी असणाऱ्या आणि शिनोळीत क्लिनिक चालवत सेवा बजावणाऱ्या एका डॉक्टरला लागण झाली होती त्या नंतर डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या शिनोळी येथील दोन महिलांना याची लागण झाली होती आज डॉक्टरच्या पत्नीचा देखील रिपोर्ट पॉजिटिव्ह आला आहे.त्या देखील डॉक्टर असून शिनोळीत क्लिनिक चालवतात.
या महिला डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या आणखी दोघा पुरुषांचे नमुने देखील पोजिटिव्ह आले आहेत ते पुरुष अंदाजे 50 व 55 वर्षाचे असून डॉक्टर महिला अंदाजे 38 वयाची आहे.पुरुष डॉक्टरावर बेळगावातील बिम्स मध्ये उपचार सुरू असून उर्वरित पाच रुग्णांवर चंदगड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शिनोळी गावच्या सरपंचानी गाव सील डाऊन इतर सदस्या सोबत मोलाची कामगिरी बजावली असून स्वतः देखील क्वारंटाइन झाले आहेत.
दोन्ही डॉक्टर आणि इतर चार जणांच्या संपर्कात आलेल्या 40 हुन अधिक जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.शिनोळी सील डाऊन करण्यात आली असून या भागातील शेती कामे देखील बंद आहेत या शिवाय बाची,कुद्रेमनी, देवरवाडी आदी गावात सतर्कता बाळगली जात आहे. दरम्यान बाची जवळील कर्नाटक महाराष्ट्र सीमा सील कऱण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थातुन केली जात आहे.