राज्यभरात सलग दुसऱ्या दिवशी नव्याने 5 हजाराहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार आज शुक्रवार दि. 24 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 85,870 इतकी झाली आहे. बेळगाव जिल्ह्यात नव्याने 116 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 1,645 झाली आहेत.
राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार गुरुवार दि. 23 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज शुक्रवार दि. 24 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 5,007 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 85,870 झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 52,791 असून यापैकी 611 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
राज्यभरात आज शुक्रवारी 2,037 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 31,347 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 110 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 1,724 झाली असून यापैकी 8 जणांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.
बेळगाव जिल्ह्यात आज निवाने 116 रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 1,645 झाली आहे. जिल्ह्यात 1184 ऍक्टिव्ह केसेस असून गेल्या 24 तासात एका मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा 35 झाला आहे. आतापर्यंत कोरोना मुक्त झाल्यामुळे 426 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून गेल्या 24 तासात या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आज सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पहिल्या पांच क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 2267 रुग्ण – एकूण रुग्ण 41467), म्हैसूर (281-2450), उडपी (190-3036), बागलकोट (184-1168), मंगळूर (180-4389) आणि बेळगाव (116-1645).