अलतगा गायरान जमीन अनेकांच्या डोळ्यात खुपू लागले आहे. त्यामुळे ही जमीन हडप करण्यासाठी अनेक बड्या नेत्यांनी आपले प्रयत्न सुरू केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र ही जमीन हडप केल्यास अलतगा जाफरवाडी कडोली अगससगा कंग्राळी आदी भागातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे.
गायरान जमीन ही डोंगराळ असून या खडकाळ जमिनीतील माती चोरण्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर आता काही बड्या नेत्यांनी या जमिनीवर डोळा ठेवल्याची माहिती उपलब्ध झालेला आहे. काहीनी तर मोठ्या टोलेजंग इमारती उभे करण्याचे स्वप्नही पाहिले आहेत. त्या दृष्टिकोने पाऊले उचलण्यात आले आहेत.
मात्र या परिसरातील नागरिकांतून त्याला विरोध होत आहे. आता ही जमीन वाचवण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या आंदोलन छेडण्याची गरज निर्माण झाली आहे. येथे एका मोठ्या आस्थापनासाठी तीनशे एकर जमीन ताब्यात घेण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. नजीकच असलेल्या गावातील शेतकऱ्यांनी ही जमीन बॉन्ड द्वारे काहींच्या नावावरही केल्याचे उघडकीस आले आहे.
त्यामुळे आता ही जमीन वाचविण्यासाठी मोठे प्रयत्न होण्याची गरज व्यक्त होत आहे. अलतगा गायरान जमिनी मध्ये शेकडो जनावरे चरण्यासाठी सोडण्यात येतात. जर ही जमीन बळकावली तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नाबरोबरच समस्याही निर्माण होणार आहेत. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
धमकावून जमिनी ताब्यात घेण्याचे प्रकार आलतगा, आंबेवाडी आदी परिसरातील सुमारे तीनशे एकर जमीन एका एजंटने बळकावण्याचा प्रयत्न केल्याची माहिती उघड झाली आहे. राज्य सरकार आणि शेतकऱ्यांच्या मधला एजंट म्हणून त्याने या प्रकरणात बक्कळ माया जमवण्याची चर्चा जोरदार सुरू आहे. त्यामुळे पहिला या एजंट चा बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त होत आहे.