मारुती रोड, जुने गांधीनगर, बेळगाव येथील आदर्श संजय कंग्राळकर या युवकाने याने इन्फिनिटी इव्हेंट अँड इंटरटेनमेंटतर्फे आयोजित फॅशन शोमधील “मि. लोणावळा -2020” हा मानाचा किताब पटकाविला आहे.
महाराष्ट्रातील लोणावळा येथील इन्फिनिटी इव्हेंट अँड इंटरटेनमेंट या संस्थेतर्फे दरवर्षी मिस्टर लोणावळा आणि मिस्टर खंडाळा ही फॅशन शोची स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा प्रत्यक्ष न घेता ऑनलाईन घेण्यात आली होती.
या स्पर्धेत पुण्याला डिप्लोमा इन एव्हिएशनचे शिक्षण घेणाऱ्या मारुती रोड, जुने गांधिनगर, बेळगाव येथील आदर्श संजय कंग्राळकर या युवकाने भाग घेऊन मि. लोणावळा -2020 हा किताब हस्तगत केला. मि. लोणावळा किताबाच्या फॅशन शो स्पर्धेमध्ये महाराष्ट्र आणि परिसरातील सुमारे 25 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.
या सर्व स्पर्धकांच्या ऑनलाइन मुलाखती घेण्यात आल्या. विविध प्रश्नांद्वारे त्यांच्या बुद्धिमत्तेची चांचणी घेण्यात आली. त्यांच्याकडून रॅम्पवॉक करून घेण्यात आला. वेशभूषेसाठी प्रत्येकाला वेगवेगळी थीम देण्यात आली होती.
आदर्श कंग्राळकर याला 90 सालामधील पोशाखाची थीम दिली गेली होती. यासाठी आदर्शने “काऊ बॉय” पोशाख निवडला होता. अखेर स्पर्धेसाठीच्या सर्व चाचण्यांमध्ये आदर्श कंग्राळकर यांची कामगिरी सर्वात सरस ठरल्याने मानाच्या “मि. लोणावळा -2020” किताबासाठी याची निवड केली गेली. या स्पर्धेचा निकाल इन्फिनिटी इव्हेंट अँड इंटरटेनमेंटच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर आज सायंकाळी किंवा उद्या शुक्रवारी जाहीर केला जाणार आहे. उपरोक्त यशाबद्दल आदर्श कंग्राळकर यांचे त्याच्या सर्वत्र अभिनंदन होत आहे.