के व्ही राजेंद्र यांनी घेतली परीक्षार्थींची भेट कोरोनामुळे कोणत्याही विद्यार्थ्यावर त्याचा परिणाम होऊ नये तसेच विद्यार्थ्यांनी सुरक्षित आणि बेधडक पेपर लिहावे यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के वी राजेंद्र यांनी काही केंद्रांवर जाऊन भेटी दिल्या आहेत.
याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना न घाबरता पेपर लिहा असे आवाहन केले आहे. वेगवेगळ्या भागात त्यांनी जाऊन पाहणी केली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. कोणत्याही दडपणाखाली येऊन किंवा कोणाची भीती बाळगून पेपर कमी लिहू नका जे काही तुमच्या बुद्धिमत्तेला उत्तर येईल ते लिहा. मागील दोन-तीन महिन्यांपासून आपण अभ्यास केला आहात. त्याचा योग्य तो पुरेपूर फायदा या परीक्षेत पेपर लिहिण्यासाठी करावा असे आवाहन केले आहे.
याचबरोबर अनेक ठिकाणी सॅनिटायझर मास्क घालून विद्यार्थी परीक्षेला बसले की नाही याची पाहणी केली आहे. त्यांच्या या पाहणी दौऱ्यात मुळे विद्यार्थ्यांमध्ये मनोबल वाढले आहे.
के वी राजेंद्र यांनी विद्यार्थ्यांना दिलेले मनोबल वाढविण्याचे काम हे वाखाणण्याजोगी आहे. या पुढेही आता अशाच प्रकारे अनेक ठिकाणी भेटी देऊन विद्यार्थ्यांची कशाप्रकारे दक्षता घेण्यात आली याकडे त्यांनी लक्ष देणार असल्याचे सांगण्यात आले.