ट्रॅक्टरवर बसलेला युवक पडल्याने त्याच्या अंगावरून ट्रॉली गेल्याने झालेल्या अपघातात संतीबस्तवाड येथील युवक ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. मच्छे औद्योगिक वसाहतीत अभिषेक अलायन्स फॅक्टरी जवळ नवीन ब्रिज जवळ ही घटना घडली आहे.
अशोक सदानंद नायक वय 35 रा. बामनवाडी क्रॉस संतीबस्तवाड असे या घटनेत मयत झालेल्या युवकाचे नाव असून तो ट्रॅक्टर वर कुली काम करत होता.
ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत अशोक हा ट्रॅक्टर चालकाच्या बाजूला बसून जात होता ट्रॅक्टर टर्न घेतेवेळी मडगाड वर बसलेला युवक खाली पडला त्यात ट्रॉली त्याच्या अंगावरून गेली या अपघातात तो घटनास्थळीच ठार झाला आहे.बेळगाव ग्रामीण पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.