कोरोना मुक्त झालेल्या 22 रुग्णांना आज बिम्स मधून डिस्चार्ज देण्यात आला. सोमवारच्या बेळगाव आरोग्य खात्याच्या मेडिकल बुलेटिन मध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
सोमवारी कोरोना मुक्त झालेले रुग्ण 7 हुक्केरी,1 गोकाक,1कोप्पळ,1 बागलकोट आणि 12 जण बेळगाव तालुक्यातील आहेत.
आजवर बेळगाव जिल्ह्यात 305 रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 247 बरे झाले आहेत.अद्याप 25 रुग्णाचे रिपोर्ट येणे शिल्लक आहे.