Tuesday, January 7, 2025

/

कोरोनामुळे चार विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षेस बसण्यास मज्जाव

 belgaum

राज्यभरात उद्या गुरुवारपासून इयत्ता दहावीच्या अर्थात एसएसएलसीच्या बोर्ड परीक्षेला प्रारंभ होत असून 8.50 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गामुळे बेळगांव जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.

बेळगाव जिल्ह्यासह राज्यभरात उद्या गुरुवार दि. 25 जून 2020 पासून इयत्ता दहावीच्या (एसएसएलसी) परीक्षेला प्रारंभ होत आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात ही परीक्षा घेण्यात येत असल्यामुळे राज्य शासनाच्या आदेशावरून सर्व त्या आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तथापि कोरोना संसर्गामुळे बेळगांव जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांपैकी एक जण कोरोनाबाधित असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाबाधित विद्यार्थ्यांसह त्याच्या संपर्कातील त्याच्या तीन मित्रांना मान्यताप्राप्त हॉस्पिटलमध्ये काॅरन्टाईन करण्यात आले आहे.

Sslc exam ready
Sslc exam ready

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बेळगाव जिल्ह्यासह राज्यात कंटेनमेंट झोन करण्यात आले आहेत. कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना या झोनची सीमारेषा ओलांडण्यास बंदी आहे, हे लक्षात घेऊन शिक्षण खात्याने यावर उपाय शोधून काढला आहे. त्यानुसार राज्यात जितके कंटेनमेंट झोन आहेत येथील विद्यार्थ्यांची त्यांच्या-त्यांच्या झोनमध्येच दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे हे विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर जाणार नाहीत आणि त्यामुळे इतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये असलेली कोरोना संसर्गाची भीती देखील नाहीशी होणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील कंटेनमेंट झोनमधील एकूण 20 विद्यार्थी यंदाची दहावीची परीक्षा देणार आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलीस खात्याच्या सहकार्याने जिल्हा शिक्षण खात्याकडून या विद्यार्थ्यांची आता त्यांच्या-त्यांच्या झोनमध्ये परीक्षेची व्यवस्था केली जाणार आहे.

दरम्यान, उद्या गुरुवार 25 जूनपासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ होत असल्याने शहरातील परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्वतयारी केली जात आहे. महिला विद्यालय मंडळ इंग्लिश मीडियम स्कूल या परीक्षा केंद्राच्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून सोशल डिस्टंसिंगचे पालन केले जावे यासाठी बुधवारी जमिनीवर मार्किंग करण्याबरोबरच अन्य आवश्यक कामे सुरू असल्याचे पहावयास मिळाले. महीला विद्यालयाप्रमाणेच शहरातील अन्य परीक्षा केंद्राच्या ठिकाणीही सोशल डिस्टंसिंगचे मार्किंग, सॅनीटायझेशन व मास्कची व्यवस्था, सोशल डिस्टंसिंगनुसार विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक टाकणे आदी कामे सुरू होती. उद्यापासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेत दरम्यान कडक पोलिस बंदोबस्तसह कोरोना संदर्भातील नियमांचे देखील काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.