कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून काल सायंकाळीनंतर राज्यात आणखी 397 रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार आज बुधवार दि. 24 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 10,118 इतकी झाली आहे. कोरोनामुळे राज्यात आणखी 14 जण मृत्युमुखी पडले आहेत. बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात आणखी एक रुग्ण आढळून आला असल्यामुळे रुग्णांची संख्या 312 इतकी झाली आहे.
राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. 23 जून सायंकाळी 5 वाजल्यापासून आज बुधवार दि. 24 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 397 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये 8 आंतरराष्ट्रीय, तर 75 आंतरराज्य प्रवाशांचा समावेश आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 3,799 असून यापैकी 112 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात 149 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 6,151 इतकी झाली आहे. कोरोनामुळे आणखी 14 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 164 झाली असून यापैकी चौघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.
कर्नाटकातील 30 जिल्हे कोरोनाग्रस्त असून यामध्ये बेंगलोर शहर सर्वाधिक 1,678 रुग्ण संख्येसह प्रथम क्रमांकावर आहे. गेल्या 24 तासात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले राज्यातील पहिल्या पाच क्रमांकाचे जिल्हे पुढील प्रमाणे आहेत. बेंगलोर शहर (आज 173 रुग्ण – एकूण रुग्ण 1,678), बेळ्ळारी (34 -529), कलबुर्गी (22 – 1,254), रामनगर (22 -114) आणि उडपी (आज 14 रुग्ण – एकूण 1102).