Sunday, November 17, 2024

/

एका दिवसात आढळले तब्बल 1,267 रुग्ण : जिल्ह्याची संख्या झाली 326

 belgaum

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून काल सायंकाळीनंतर राज्यात आणखी तब्बल 1,267 रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार रविवार दि. 28 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 13,190 इतकी झाली आहे. कोरोनामुळे राज्यात आणखी 16 जण मृत्युमुखी पडल्याने मृतांच्या संख्येने व्दिशतक पार केले आहे. बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात 8 रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 326 इतकी वाढली आहे.

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवार दि. 27 जून सायंकाळी 5 वाजल्यापासून आज रविवार दि. 28 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 1,267 रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या 13,190 झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 5,472 असून यापैकी 243 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात 220 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 7,507 इतकी झाली आहे. कोरोनामुळे आणखी 16 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 207 झाली असून यापैकी चौघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.

कर्नाटकातील 30 जिल्हे कोरोनाग्रस्त असून यापैकी गेल्या 24 तासात सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पहिल्या 15 क्रमांकाचे जिल्हे पुढीलप्रमाणे आहेत. बेंगलोर शहर (आज 783 रुग्ण – एकूण 3314), मंगळूर (97 -665), बेळ्ळारी (71 -697), उडपी (40 -1179), कलबुर्गी (34 – 1398), हासन (31 -359), गदग (30 -170), बेंगलोर ग्रामीण (27 -105), धारवाड (18 -311), म्हैसूर (18 -253), बागलकोट (17 -180), कारवार (14 -189), हावेरी (12 -69), कोलार (11 -115), बेळगाव (आज 8 रुग्ण – एकूण 326).

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.