Friday, March 29, 2024

/

राज्यांची संख्या झाली 5,760 : नव्याने आढळले 308 रुग्ण

 belgaum

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार सोमवार दि. 8 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 308 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोनेबाधितांची संख्या एकूण 5,760 इतकी झाली आहे. उडपी जिल्हा बेंगलोर शहरासह सर्वांना मागे टाकत सर्वाधिक 947 रुग्णांसह पहिल्या क्रमांकावर आहे. बेळगावच्या स्थानिक प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेच्या प्रसंगावधानामुळे राज्याच्या क्रमवारीत बेळगाव जिल्हा 17 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार रविवार दि. 7 जून सायंकाळी 5 वाजल्यापासून आज सोमवार दि. 8 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 308 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 5,760 झाली असून नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये 1 आंतरराष्ट्रीय, तर 277 आंतरराज्य प्रवाशांचा समावेश आहे. राज्यातील 5,760 कोरोनाग्रस्तांपैकी 2,519 जणांना आत्तापर्यंत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 3,175 असून यापैकीभ 14 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 3 मृत्यू झाल्यामुळे राज्यातील मृतांची संख्या 64 झाली असून यापैकी दोघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांपैकी उडपी जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात आणखी 45 रुग्ण आढळून आल्यामुळे सध्या राज्यात सर्वाधिक 947 रुग्णांसह हा जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. कर्नाटकातील एकूण 29 जिल्हे कोरोनाग्रस्त असून या जिल्ह्यात आज सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. उडपी (आज 45 -एकूण 947), कलबुर्गी (99 -759), यादगिरी (66 -581), बिदर (48 -270), बेंगलोर शहर (18 – रुग्ण 493), रायचूर (0 -359), मंड्या (0 -334), बेळगाव (0 -301), हासन (3 -211), दावणगिरी (13 -179), चिकबळ्ळापूर (0-150), मंगळूर (3-187), विजयपुरा (0 -202), म्हैसूर (0 -97), बागलकोट (2 -93), कारवार (0 -96), बेळ्ळारी (8 -68), शिमोगा (4 -69), धारवाड (4 -64″), चित्रदुर्ग (0 -40), गदग (6 -49), तुमकुर (0 -33), कोलार (0 -30), बेंगलोर ग्रामीण (0 -36), चिक्कमंगळूर (0 -18), हावेरी (0 -22), कोप्पळ (0 -04), कोडगु (1 -06) आणिस रामनगर (आज 1 – एकूण रुग्ण 5). याखेरीज 34 जण राज्याच्या अन्य भागातील आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.