कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार सोमवार दि. 15 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 7,213 इतकी वाढली असून यापैकी 4,135 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसात बेळगाव जिल्ह्यामध्ये मात्र एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची एकूण संख्या 304 इतकी स्थिर आहे.
राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार रविवार दि. 14 जून सायंकाळी 5 वाजल्यापासून आज सोमवार दि. 15 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 213 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये 23 आंतरराष्ट्रीय, तर 103 आंतरराज्य प्रवाशांचा समावेश आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांत मुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7,213 झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 2,987 असून यापैकी 56 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 2 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 88 झाली असून यापैकी तिघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांपैकी उडपी जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात आणखी 2 रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यात सर्वाधिक 1,028 रुग्णांसह हा जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. चामराजनगरचा अंतर्भाव झाल्याने कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 झाली असून या सर्व जिल्ह्यांमध्ये आज सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. कलबुर्गी (आज 48 रुग्ण – एकूण रुग्ण 944), बेंगलोर शहर (35 – 725), धारवाड (34 -155), मंगळूर (23 -291), रायचूर (18 -403), यादगिरी (13 -822), बिदर (11 -381), बेळ्ळारी (10 -197), कोप्पळ (4 -17), विजयपुरा (3 -232), बागलकोट (3 -107), शिमोगा (3 -94), उडपी (2 -1028), हावेरी (2 -27), रामनगर (3 – 21), हासन (1 -238), दावणगिरी (1 -227), मंड्या (0 -343), बेळगाव (0 -304), चिकबळ्ळापूर (0-152), म्हैसूर (0 -114), कारवार (0 -114), गदग (0 -49), कोलार (0 -48), चित्रदुर्ग (0 -43), तुमकुर (0 -41), बेंगलोर ग्रामीण (0 -38), चिक्कमंगळूर (0 -19), कोडगु (0 -3) आणि चामराजनगर (आज 0 रुग्ण- एकूण रुग्ण 1). याखेरीज इतर 35 रुग्णांमध्ये परराज्यातील रुग्ण आणि परदेशातून आलेल्या प्रवासी रुग्णांचा समावेश आहे.